अभियंता एफआयआर प्रकरण; सीएसएमटी स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेरील सीएसएमटी स्थानकावरुन गाड्या सोडत नसल्याने ऐन गर्दीच्या वेळी मोठा खोळंबा झाला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडून कल्याण, खोपोली, कर्जतला जाणाऱ्या गाड्या न सोडल्याने स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. रेल्वे कर्मचारी आणि जीआरपी यांच्या वादातून कर्मचारी यांनी रेल्वे न सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे घरी जाण्याच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेची वाहतूक अचानक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. परिणामी सीएसएमटीहून कसारा-कर्जत, कल्याणकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे. रेल्वे कर्मचारी आणि जीआरपी यांच्या वादातून कर्मचारी यांनी रेल्वे न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंब्रा येथील झालेल्या अपघातामुळे इंटरनल इन्क्वायरीमध्ये दोन इंजिनिअर यांच्यावरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केल्यामुळे युनियनने स्ट्राइक केलेला आहे. जोवर इंजिनिअरवर टाकलेल्या एफआयआर मागे घेतल्या जात नाही तोवर आंदोलन करण्याचा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. संध्याकाळी ऑफिसवरून घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र अचानक हा बिघाड झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे अनेक कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवरही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.