हायकोर्टाने मतदार यादीवरील चार याचिका फेटाळल्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील घोळांवर दाखल झालेल्या चार याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. मतदार यादीच्या ड्राफ्टवर आक्षेप घेण्यासाठी कमी अवधी, ऑनलाइन अर्ज करूनही नाव न येणे आणि नाव ट्रान्सफर संदर्भातील मागण्यांवर या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्रक्रिया योग्य असल्याचे नमूद करत आक्षेप ग्राह्य धरता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
मतदार यादी, सीमांकन आणि आरक्षण या मुद्द्यांवर एकूण ४२ याचिका दाखल असून त्यांवरील एकत्रित सुनावणी सुरू आहे. गुरुवारी सीमांकन आणि आरक्षणासंबंधीच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे.