सायबर जनजागृती सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुरक्षेचं मार्गदर्शन
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे — सायबर महा निमित्त कापूरबावडी पोलीस ठाणे आणि इगल ब्रिगेड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मानपाडा येथील संकेत विद्यालयात सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक श्री. विशाल शिंदे आणि श्री. विश्वनाथ बिवलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षा आणि जबाबदार डिजिटल वापर या विषयांवर मार्गदर्शन केले.
या उपक्रमात १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून विद्यार्थ्यांना सुरक्षित इंटरनेट वापराबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली.