कळवा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी! चैन स्नॅचिंग प्रकरणातील दोघे अटकेत; कौशल्यपूर्ण तपासातून नवी मुंबईतील दोन जुने गुन्हे उघड

Spread the love

कळवा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी! चैन स्नॅचिंग प्रकरणातील दोघे अटकेत; कौशल्यपूर्ण तपासातून नवी मुंबईतील दोन जुने गुन्हे उघड

पोलीस महानगर नेटवर्क 

कळवा – कळवा पोलिसांच्या तपासपथकाने कौशल्यपूर्ण कारवाई करत चैन स्नॅचिंग प्रकरणातील दोन आरोपींना मफतलाल झोपडपट्टी, कळवा (पूर्व) येथून ताब्यात घेतले आहे. अटकेत घेतलेल्या आरोपींची नावे फैजान उर्फ सानू शेख आणि रेहान आलम शेख अशी असून, दोघेही या परिसरातील रहिवासी आहेत.

या दोघांकडून सखोल चौकशी करताना पोलिसांनी नवी मुंबईतील दोन जुन्या चैन स्नॅचिंग गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे या तपासपथकाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर आरोपींना पुढील तपासासाठी रबाळे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणी आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

कळवा पोलिसांच्या तात्काळ आणि परिणामकारक तपासामुळे गुन्हेगारीवर पुन्हा एकदा आळा बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon