नवरात्र उत्सवानिमित्त कोळशेवाडी पोलिसांचा भव्य रूट मार्च
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोळशेवाडी पोलिस स्टेशन हद्दीत बुधवारी संध्याकाळी भव्य रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ श्री. अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
हा रूट मार्च सायंकाळी ५.१० ते ६.१० या वेळेत विठ्ठलवाडी पाण्याच्या टाकीजवळून सुरू होऊन खडेगोलवली गाव कमान, गॅस गोडाऊन चौक, कैलास नगर, हनुमान नगर, काटे मानवली नाका, कोळशेवाडी स्टेशन रोड, नाना पावशे चौक, उत्तेकर चौक, दुर्गामाता मंदिर मार्गे डबल टॉवर आनंदवाडी येथे समाप्त झाला.
या रूट मार्चमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त (कल्याण विभाग) श्री. कल्याणजी घेटे, १६ अधिकारी, ८० अंमलदार, सीआरएम वाहन, बीट मार्शल, पीसीआर टू व पीटर मोबाईल अशी भक्कम फौजफाट्याची उपस्थिती होती.
रूट मार्च दरम्यान परिसरातील नागरिकांना जातीय तेढ निर्माण न करणे, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवणे तसेच कोणत्याही शंका किंवा अडचणीसाठी थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.