कुख्यात गुंड टिपु पठाणच्या बेकायदेशीर साम्राज्यावर कळेपाडल पोलिसांचा हातोडा!

Spread the love

कुख्यात गुंड टिपु पठाणच्या बेकायदेशीर साम्राज्यावर कळेपाडल पोलिसांचा हातोडा!

पोलीस महानगर नेटवर्क 

पुणे – कुख्यात गुंड टिपु रिसवान ऊर्फ टिपु सत्तार पठाण (रा. साय्यदनगर, हडपसर) याचे बेकायदेशीर ऑफिसेस, टपऱ्या आणि बांधकामे कळेपाडल पोलिस स्टेशन, अतिक्रमण विभाग आणि पुणे महानगरपालिकेने संयुक्त कारवाईत जमीनदोस्त केली.

२६ सप्टेंबर २०२५ रोजी ही मोठी कारवाई करण्यात आली. टिपु पठाणवर खून, खुनाचा प्रयत्न, हल्ला, शस्त्रास्त्र बाळगणे यांसह भा.दं.वि. कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५, शस्त्रास्त्र कायदा कलम ३(२५) तसेच मकोका अंतर्गत गंभीर गुन्हे नोंद आहेत.

पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सय्यदनगर परिसरातील खजान मळा व इस्माईल मळा येथील त्याची बेकायदेशीर बांधकामे पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाने हटवली.

या कारवाईसाठी पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ डॉ. राजकुमार सिंह, सहायक पोलीस आयुक्त अशुतोष गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पाटील, पोलीस निरीक्षक अमर काळे आणि कळेपाडल पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी मोलाचा सहभाग नोंदवला. या संयुक्त मोहिमेमुळे गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस आणि महापालिकेची संयुक्त कार्यपद्धती अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon