प्रांजल खेवलकर यांना जामीन; खोट्या आरोपात अडकवलं गेलं – एकनाथ खडसे

Spread the love

प्रांजल खेवलकर यांना जामीन; खोट्या आरोपात अडकवलं गेलं – एकनाथ खडसे

पोलीस महानगर नेटवर्क 

जळगाव – पुण्यातील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक झालेल्या प्रांजल खेवलकर यांना अखेर पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत खेवलकर यांच्यावर आयुष्यात एकही गुन्हा नसताना त्यांना राजकीय सूडबुद्धीने अडकवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला.

खडसे म्हणाले, “प्रांजल खेवलकर यांना खोट्या आरोपाखाली पहिला आरोपी करण्यात आलं. कुणाच्यातरी सांगण्यावरून त्यांना गोवलं गेलं. महाराष्ट्रातील राजकारण किती खालच्या थरावर गेलं आहे, याचं हे उत्तम उदाहरण आहे.”

२७ जुलै रोजी पुण्यातील खराडी भागातील एका खोलीत चालू असलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. या प्रकरणात खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांच्यावर ड्रग्ज बाळगल्याचा आरोप केला होता. मात्र, खडसे यांच्या मते प्रत्यक्षात चार-पाच जण एका घरात पार्टी करत होते, ती रेव्ह पार्टी ठरू शकत नाही. तसेच खेवलकर यांनी ना ड्रग्ज सेवन केले होते, ना ते बाळगले होते.

जामीन मंजूर झाल्यानंतर खडसे यांनी विश्वास व्यक्त केला की, न्यायालयीन प्रक्रियेत प्रांजल खेवलकर निर्दोष सुटतील. “प्रांजलवर आयुष्यात एकही गुन्हा नव्हता, तरी मोठ्या गुन्ह्यांचे ठपके ठेवले गेले. राजकीय दबावामुळे हे प्रकरण उभं करण्यात आलं,” असा आरोपही त्यांनी केला.

खेवलकर यांच्यासह इतर आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने आता ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुरुंगाबाहेर येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon