स्वारगेट परिसरातील दोन आयुर्वेदिक मसाज सेंटरवर छापा; ५ महिलांची सुटका, २ महिलांना अटक

Spread the love

स्वारगेट परिसरातील दोन आयुर्वेदिक मसाज सेंटरवर छापा; ५ महिलांची सुटका, २ महिलांना अटक

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे : पुण्यातील स्वारगेट परिसरात पोलिसांनी दोन वेगवेगळ्या आयुर्वेदिक मसाज सेंटरवर छापा टाकत देहविक्रीचा पर्दाफाश केला. या कारवाईत एकूण पाच महिलांची सुटका करण्यात आली असून दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.

मार्केट यार्ड परिसरातील वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ छापा टाकण्यात आला. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली, तर छत्रपती संभाजीनगर येथील एका महिलेला अटक करण्यात आली.

तर मुकुंदनगर येथील दिया आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी तोतया ग्राहक पाठवला. माहिती खरी ठरल्यावर छापा टाकण्यात आला आणि एका महिलेची सुटका करण्यात आली. या प्रकरणात ३८ वर्षीय महिलेला अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही कारवायांमुळे बोगस मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. महिलांना पैशाचे आमिष दाखवून किंवा मजबुरीचा फायदा घेत देहविक्रीस भाग पाडले जात असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. अशा प्रकारच्या केंद्रांवर लक्ष ठेवून कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon