“लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शिक्षिकेची २२ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल”
पोलीस महानगर नेटवर्क
अहिल्यानगर – लग्नाचे आमिष दाखवून राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील ४२ वर्षीय शिक्षिकेची सुमारे २२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार नोंद झाली आहे. सावेडी उपनगरातील शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अक्षय रामदास काळे, त्याची आई सविता काळे आणि बहीण सुप्रिया काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने सांगितले की, सन २०१९ मध्ये नगर-मनमाड रस्त्यावर एका चहा दुकानावर अक्षयशी ओळख झाली. त्यानंतर फोनवर संबंध सुरु झाले आणि आरोपींनी लग्नाची खोटी संमती दर्शवून विश्वास संपादन केला. कर्जफेड, दागिने खरेदी आणि दुकानासाठी पीडितेने मोठी रक्कम – १ तोळा सोन्याची चैन, ९५ हजार रुपये रोख आणि सुमारे २२ लाख रुपयांचे कर्ज – पाठवले. महिन्याला ४० हजार रुपये देण्यासही पीडितेला भाग पाडण्यात आले. तोफखाना पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.