दुचाकीला रस्ता दिला नाही या क्षुल्लक कारणावरुन मध्यरात्री कोथरूड भागात घायवळ टोळीतील गुंडांकडून गोळीबार; ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ गंभीर जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचा त्रास आता सर्वसामान्यांनाही सहन करावा लागत असल्याची घटना कोथरूडमध्ये समोर आली आहे. गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मध्यरात्री कोथरूड भागात गोळीबार झाला. कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील सदस्यांनी केलेल्या या गोळीबारात ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. जेव्हा गोळीबार झाला तेव्हा धुमाळ आपला जीव वाचवण्यासाठी धवात होते, त्यावेळी त्यांच्या अंगावरून पडणाऱ्या रक्ताने माखलेले पायाचे ठसे परिसरात उमटल्याचं दिसून येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, यामुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. प्रकाश धुमाळ नावाची ३६ वर्षांचा व्यक्ती रात्री मुठेश्वर मंदिरासमोर उभा होता. यावेळी दुचाकीला रस्ता दिला नाही या क्षुल्लक कारणावरुन घायवळ टोळीतील गुंडांकडून गोळीबार सुरु करण्यात आला. यातील तीन गोळ्या प्रकाश धुमाळ यांना लागल्या. जीव वाचवण्यासाठी ही व्यक्ती एका इमारतीच्या दिशेने धावली आणि एका पाण्याच्या टाकीवर चढून लपुन बसली. या दरम्यान या ठिकाणी राहणाऱ्या सचिन गोपाळघरे नावाच्या व्यक्तीने प्रकाश धुमाळ यांना पाणी दिले, आणि मदत केली. या दरम्यान प्रकाश धुमाळ यांच्या शरिरातून वाहणारं रक्त या इमारतीच्या भोवताली पडलेलं होतं, पायाचे ठसे उमटलेले होते.
या घटनेनंतर अर्ध्या तासांनी पोलीस घटनास्थळी आले असं गोपाळघरे यांच म्हणणं आहे. विशेष म्हणजे जिथे ही घटना घडली ते ठिकाण पोलिस स्टेशनपासून २०० मीटर अंतरावर आहे. हा गोळीबार निलेश घायवळ टोळीतील गुंडांकडून करण्यात आला आहे. या टोळीतील मयुर कुंभारेने हा गोळीबार केला असून त्याला पोलीसांनी अटक केली आहे. मात्र त्याचे इतर साथीदार फरार झाले आहेत. या घटनेने पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुंडांकडे सहजपणे शस्त्रं आढळत असून सामान्य नागरिकांवर गोळीबार केला जात असेल तर पोलीसांची जरब उरलीय का असा प्रश्न उपस्थित होतोय. गोळीबाराची घटना घडली ते ठिकाण कोथरुड पोलीस स्टेशनपासून चालत दिड ते दोन मिनीटांच्या अंतरावर आहे. मात्र बुधवारी रात्री या ठिकाणी घायवळ टोळीती गुंडांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर अर्ध्या तासांनी पोलीस आले असं स्थानिकांनी म्हटलंय. तोपर्यंत प्रकाश धुमाळ नावाची व्यक्ती जीव मुठीत धरुन पाण्याच्या टाकीवर बसून होती. सचिन गोपाळघरे नावाच्या स्थानिक नागरिकाने प्रकाश धुमाळ यांना पाणी दिले. या घटनेने पुण्यात गुंडांना पोलीसांचा जरब उरलाय का? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
गाडीला साईड दिली नाही म्हणून क्षुल्लक कारणावरून तीन गोळ्या झाडण्यात आल्या. निलेश घायवळ टोळीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात प्रकाश धुमाळ हा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. गोळ्या लागल्यानंतर तो तशाच अवस्थेत आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता. त्या ठिकाणी रक्ताचे आणि पायाचे ठसे दिसून येत आहेत. कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत. घायवळ टोळीतील मुसा शेख, रोहीत आखाड, गणेश राऊत आणि मयुर कुंभारे यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडलीय आहे. मयुर कुंभारे आणि आनंद चांडलेकर या आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. इतर आरोपी फरार आहेत. मयुर कुंभारेने हा गोळीबार केला आहे.आरोपींपैकी मयुर कुंभारेने तीन गोळ्या झाडल्यात. यामध्ये प्रकाश धुमाळ यांच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली आहे, त्यावेळी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला, परिसरात त्यांचं रक्त पडल्याचं दिसून आलं.प्रकाश धुमाळ यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो रात्री मित्रांसोबत उभा होता तेव्हा दुचाकीला रस्ता दिला नाही या क्षुल्लक कारणावरुन ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.