दुकानाच्या गाळ्याच्या मालकी हक्कावरून मराठी आणि परप्रांतीय कुटुंबामध्ये वाद
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण पूर्वेत ओम सीता अपार्टमेंटमध्ये दुकानाच्या गाळ्याच्या मालकी हक्कावरून मराठी आणि परप्रांतीय कुटुंबामध्ये वाद सुरू आहे. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी केडीएमसी अधिकार आणि पोलीस इमारतीत पोहोचले. अधिकाऱ्यांना या ठिकाणी मोजणी करायची होती. मात्र दुबे कुटुंबीयांनी घराच्या मोजणीला प्रचंड विरोध केला. यादरम्यान केडीएमसी अधिकारी आणि पोलिसांसोबत अरेरावी केली. एवढेच नाही तर महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण देखील करण्यात आली. अखेर या प्रकरणात कोळशेवाडी पोलिसांनी सुशील दुबे, मंजू दुबे आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या चावा घेणाऱ्या नेहा दुबे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त जात आहे. कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरात ओम सीता अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटच्या तळमजल्यावर एक रेशनिंग दुकान आहे. हे दुकान विवेक सांगळे या मराठी कुटुंबीयांचे आहे. मात्र या दुकानात सांगळे कुटुंबीयांनी अतिक्रमण केल्याच्या आरोप सुशील दुबे कुटुंबीयांनी केला आहे. या संदर्भात दुबे कुटुंबीयांनी पाठपुरावा केला. महापालिकेच्या चौकशी दरम्यान ही बाब उघडकीस आली आहे की, ही दुकान १९९३ पासून आहे. जे विवेक सांगळे यांचे आहे. सर्व कागद पत्रे सांगळे यांचा बाजूने आहे. तरीही दुबे कुटुंब या दुकानाच्या जागेवर आपला दावा करीत आहे. दुबे कुटुंबीयांनी या संदर्भात केडीएमसी मुख्यालय बाहेर उपोषण देखील सुरू केले आहे. या प्रकरणाच्या सोक्षमोक्ष लावण्यासाठी केडीएमसीचे उपायुक्त समीर भूमकर, दोन सहाय्यक आयुक्त, कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी मंगळवारी सकाळी ओम सीता अपार्टमेंटमध्ये दाखल झाले. केडीएमसी अधिकाऱ्यांना रेशनिंग दुकान सह दुबे कुटुंबीयांचे घर आणि इतर घरांची मोजणी करायची होती. याच दरम्यान मनसे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी दाखल झाले.
महापालिका अधिकाऱ्यांनी सांगळे यांच्या दुकानाची मोजणी केली. इतर घरांची देखील मोजणी करण्यात आली. मात्र जेव्हा दुबे कुटुंबीयाच्या घराच्या मोजणी करायला अधिकारी पोहोचले. दुबे कुटुंबीयांनी जोरदार विरोध केला. यादरम्यान दुबे कुटुंबीयांनी गोंधळ घातला. महापालिका अधिकाऱ्यांना अरेरावी केली. महिला पोलिसांसोबत देखील हुज्जत घातली गेली. मनसे कार्यकर्ते आणि दुबे कुटुंबीयांमध्ये देखील वादविवाद झाला. महिला पोलीस कर्मचाऱ्याला नेहा दुबे या तरुणीने चावा देखील घेतला. हा गोंधळ जवळपास ३ तास सुरू होता. अखेर कोळसेवाडी पोलिसांनी आई लेकीला ताब्यात घेत रुक्मणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या हॉस्पिटलमध्ये देखील जवळपास एक तास गोंधळ घातला गेला. जोपर्यंत मोजणी होत नाही. तोपर्यंत या प्रकरणाच्या सोक्षमोक्ष लागत नाही. परंतु ज्या प्रकारे दुबे कुटुंबियांनी दादागिरी सुरू केली आहे. यावरून या परिसरात मराठी आणि परप्रांतीय वाद
पेटण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी सुशील दुबे त्यांची पत्नी मंजू दुबे आणि सुशील यांची मुलगी नेहा दुबे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आणि पोलिसांसोबत गैरवर्तन असा प्रकारच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तिघांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.