कापूरबावडी पोलिसांचे तत्पर काम; हरवलेला ९ वर्षीय चिमुकला पालकांच्या स्वाधीन
सुधीर गुजर / ठाणे
ठाणे : कापूरबावडी पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या दक्षतेमुळे बाळकुम परिसरात हरवलेला ९ वर्षीय चिमुकला सुखरूप पालकांपर्यंत पोहोचला.
बाळकुम परिसरात एकटाच फिरत असलेला मोहम्मद महफूज आलम (वय ९) याकडे पोलिसांचे लक्ष गेले. त्यांनी तत्परतेने मुलाची काळजी घेत त्याच्याशी संवाद साधून आवश्यक माहिती मिळवली. योग्य पडताळणी केल्यानंतर मुलाला सुरक्षितपणे त्याच्या पालकांच्या ताब्यात सोपविण्यात आले.
या कामगिरीबद्दल नागरिकांकडून कापूरबावडी पोलिसांचे मनःपूर्वक कौतुक केले जात आहे.