कल्याणमध्ये ७ बांगलादेशी नागरिक पकडले; महिलांचा संशयास्पद वावर ठरला पोलीस तपासाचा धागा

Spread the love

कल्याणमध्ये ७ बांगलादेशी नागरिक पकडले; महिलांचा संशयास्पद वावर ठरला पोलीस तपासाचा धागा

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – कल्याण रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठी कारवाई उघडकीस आली आहे. कल्याण परिसरामध्ये ६ महिला आणि १ पुरुष असे मिळून ७ बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असल्याचे पोलिसांनी पकडून काढले आहे.

ही कारवाई ९ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. सपोनि स्वप्नील भुजबळ आणि तपास पथक कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालत असताना, सहा महिला संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आल्या. महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने त्यांची चौकशी केली असता त्या बांगलादेशातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्यासंदर्भात कोणतेही वैध कागदपत्र नव्हते.

महिलांच्या मोबाईल तपासणीदरम्यान इमो अॅपचा वापर, तसेच बांगलादेशमधील ८८ सीरिजने सुरू होणाऱ्या क्रमांकावर कॉलिंग व चॅटिंग झाल्याचे पोलिसांना आढळले. काहींकडे तर थेट बांगलादेशातील जन्म प्रमाणपत्रे आणि नॅशनल आयडी कार्ड देखील सापडले.

याच कारवाईचा पुढचा धागा १० सप्टेंबर २०२५ रोजी लागला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून एक संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने स्वतःला बांगलादेशी नागरिक असल्याचे मान्य केले. त्याच्याकडे देखील बांगलादेशातील जन्म प्रमाणपत्र (नं. २००१८८११३७९०१८७८) आढळले.

पोलिसांच्या चौकशीत सर्वांनी बांगलादेशातून गुप्तपणे भारतात प्रवेश करून मुंबई गाठल्याचे मान्य केले आहे. सदर प्रकरणाची माहिती वरिष्ठांना देण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ कल्याण अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलीरामसिंग परदेशी, पोनि विजय नाईक, तसेच तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांचा समावेश आहे.

पकडण्यात आलेले बांगलादेशी नागरिक

महिला :

१. शिपा बलून पठाण (वय २७, जिल्हा मल्लवी बाजार)

२. शर्मिन मोने रुल इस्लाम (वय २०, जिल्हा पिरजपुर)

३. रीमा सागर अहमद (वय २९, ढाका विभाग)

४. सुमया अबुल कासिम (वय २०, जिल्हा नांदगंज)

५. पौर्णिमा मोहम्मद सुलेमान अख्तर (वय १९, जिल्हा फेनी)

६. जोया जास्मिन मतदार (गाजीपुर, ढाका)

पुरुष :
७. रॉकी रहीम बादशाह (बांगलादेश)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon