अत्याचाराची शिकार बनलेल्या अल्पवयीन मुलीची प्रसूती; आरोपीविरोधात वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
रायगड – पेण तालुक्यातील आमटेम परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या ओळखीतील तरुणाने प्रेमसंबंधांच्या आमिषाने लग्न करून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. पीडितेच्या अल्पवयीन असल्याची माहिती असूनही आरोपीने तिचा अज्ञातपणाचा गैरफायदा घेतल्याची तक्रार वडखळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार प्रकाश नाईक (वय २०, रा. निगडे-आदीवासिवाडी, आमटेम) याने पीडित अल्पवयीन मुलगी हिला जंगल परिसरात नेऊन जबरदस्तीने वारंवार शरीरसंबंध केले. यामुळे पीडित मुलगी गरोदर राहून ३१ ऑगस्ट रोजी तिने अलिबाग जिल्हा रुग्णालयात मुलीस जन्म दिला.
जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झालेल्या एमएलसी अहवालानंतर पीडित मुलीकडून तक्रार नोंद घेण्यात आली असून वडखळ पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोसई मती सांगळे करीत आहेत.