शांतीनगरात सराईत गुन्हेगाराकडून अवैध पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त

Spread the love

शांतीनगरात सराईत गुन्हेगाराकडून अवैध पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त

पोलीस महानगर नेटवर्क

भिवंडी – गुन्हे शाखा, घटक-२, भिवंडीच्या पथकाने सराईत गुन्हेगार नफीस उर्फ तोतला दिलावर खान (वय २३, रा. शांतीनगर, भिवंडी) यास अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून एक मौझर पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दिनांक ३० ऑगस्ट रोजी पोलीस शिपाई इंगळे यांना माहिती मिळाली होती की नफीस उर्फ तोतला हा शांतीनगर पाईपलाईन रोड परिसरात अवैधरित्या पिस्तूल घेऊन फिरत आहे. यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मिथुन भोईर व त्यांच्या पथकाने भादवडनाका ते बिलालनगर या पाईपलाईन रोडवरील ट्रान्सफार्मरजवळ सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून पिस्तूल व जिवंत काडतुसे मिळून आली.

या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १००९/२०२५ अन्वये शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. अमरसिंह जाधव व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शोध-१) श्री. शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात सपोनि भोईर, पोउनि रविंद्र पाटील, सपोउनि सुधाकर चौधरी, पोहवा बोरसे, राणे, पाटील, घाग, मपोहवा डोंगरे, पोशि इंगळे, घरत व कुंभार यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon