ठाणे पोलीस आयुक्तालयात तक्रार निवारण दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

ठाणे पोलीस आयुक्तालयात तक्रार निवारण दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयात “१०० दिवसांच्या कृती आराखड्या” अंतर्गत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या (२३ व २४ ऑगस्ट २०२५) या उपक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. सदर कार्यक्रमासाठी एकूण १५४४ अर्जदारांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी १०६२ अर्जदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले. उपस्थित नागरिकांच्या तक्रारींवर पोलीस प्रशासनाने तात्काळ कार्यवाही केली. एकूण १०३५ अर्जांचे निराकरण अर्जदारांच्या समक्षच करण्यात आले, तर उर्वरित तक्रारींचे लवकरच निरसन करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या तक्रार निवारण दिनी ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक व विविध पोलीस अधिकारी उपस्थित होते. नागरिकांना त्यांच्या तक्रारींवर जागच्या जागी दिलासा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले .ठाणेकरांनी या उपक्रमाचे स्वागत करताना “ठाणे शहर पोलिसांची ही तक्रार निवारणाची पद्धत ही विश्वासार्ह व नागरिकाभिमुख ठरत आहे,” अशा प्रतिक्रिया दिल्या.

कार्यक्रमाचे समन्वयक वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी यांनी सांगितले की, पुढील काळातही असे उपक्रम राबवून नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्याचा प्रयत्न राहील. ठाणे शहर पोलिसांचा हा उपक्रम नागरिक–पोलीस संवाद दृढ करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon