गणेशोत्सव २०२५ : कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीत भव्य समन्वय बैठक पार!
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : परिमंडळ पाच वागळे इस्टेट अंतर्गत गणेशोत्सव मंडळांची भव्य बैठक कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीत पार पडली. या बैठकीत ४०० हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला.
पोलीस उपायुक्त श्री. प्रशांत कदम यांनी मंडळ पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सर्व शंकांचे निरसन केले. तसेच निरीक्षण समितीचे पदाधिकारी यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.
या बैठकीत फायर ब्रिगेड, महावितरण तसेच ठाणे महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. उत्सव काळात सुरळीत व्यवस्था राहावी यासाठी सर्व विभागांकडून समन्वय साधून आवश्यक सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सव शांततेत, पारंपरिक पद्धतीने आणि कायद्याचे पालन करून साजरा व्हावा यासाठी ही बैठक यशस्वी ठरली.