पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; १५६३१ जागांच्या भरतीचा शासन निर्णय प्रसिद्ध

Spread the love

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; १५६३१ जागांच्या भरतीचा शासन निर्णय प्रसिद्ध

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं १२ ऑगस्टच्या बैठकीत १५६३१ पदांची पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार गृह विभागानं १५६३१ जागांवर पोलीस शिपाई भरती करण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणा-या भरती प्रक्रियेस मान्यता देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दि.१ जानेवारी २०२४ ते दि ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत रिक्त झालेली आणि शासन निर्णय क्रमांकः पोलीस-१२२५/प्र.क.१७३/पोल-५अ, दिनांक २० ऑगस्ट, २०२५ दि.०१ जानेवारी २०२५ ते दि ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रिक्त होणारी १५६३१ पदे भरतीकरीता उपलब्ध होणार आहेत.

पदनाम व रिक्त पदांची संख्या
१) पोलीस शिपाई – १२३९९
२)पोलीस शिपाई चालक – २३४
३) बॅण्डस्मन – २५
४) सशस्त्र पोलीस शिपाई – २३९३
५) कारागृह शिपाई – ५८०

शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या दि. ४ मे २०२२ आणि २१ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयातील तरतूदींमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन २०२४-२५ ची भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबविण्यास तसेच ओएमआर आधारीत लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात आलं आहे. या भरती प्रकियेसाठीही या पूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.४५०/- व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.३५०/- इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरुपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरीता खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon