व्यावसायिकावर गोळीबार करणारा निघाला पुजारी गँगचा शूटर; १ पिस्तुल, ११ जिवंत काडतुसासह पोलीसांनी घेतलं ताब्यात

Spread the love

व्यावसायिकावर गोळीबार करणारा निघाला पुजारी गँगचा शूटर; १ पिस्तुल, ११ जिवंत काडतुसासह पोलीसांनी घेतलं ताब्यात

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पिंपरीतील व्यवसायिकावर गोळीबार करणाऱ्या गँगस्टर रवींद्र घारेला पिंपरी चिंचवडच्या मालमत्ता विरोधी पथकाने बेड्या ठोकल्यात, रवींद्र घारे हा पुजारी गॅंगशी संबंधित आहे, त्याच्यावर २५ पेक्षा अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, हत्या, गोळीबार यासह इतर गुन्हे दाखल आहेत, १ पिस्तुल, ११ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केलेत, पिंपरीत व्यवसायिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावताना प्रतिकार केल्याने रवींद्र घारेने पायावर गोळी झाडली, यानंतर तो फरार झाला होता, त्याचा शोध पोलीस घेत होते, अखेर मालमत्ता विरोधी पथकाने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सराईत गुन्हेगार रवींद्र भाऊसाहेब घारे हा गँगस्टर रवी पुजारी, सुरेश पुजारी यांच्याशी संबंधित आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला पैशांची अडचण सुरू असल्याने त्याने पिंपरीतील व्यावसायिकाला हेरून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. व्यावसायिकाने प्रतिकार केल्याने घारेने त्याच्या पायावर गोळी झाडली. भरदिवसा झालेल्या या प्रकरणामुळे पिंपरीत एकच खळबळ उडाली.

रवींद्रने हेल्मेट आणि रेनकोट घातला असल्याने त्याच्या शोधासाठी अनेक अडचणी आल्या. अखेर मालमत्ता विरोधी पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन घारेला बेड्या ठोकल्या आहेत. रवींद्र घारे याच्यावर २५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. एक हत्या आणि सहा गोळीबार त्याने केलेले आहेत. सध्या तो नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायकावरील गोळीबारप्रकरणी आणि मोक्का अंतर्गत फरार होता. अखेर मालमत्ता विरोधी पथकाने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी रवींद्रकडून १ पिस्तुल, ११ जिवंत काडतुसे, दोन दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती आहेत, अशी माहिती सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड यांनी सांगितली आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या निदर्शनात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon