पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणानं संपवलं जीवन, हत्या ही आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरु
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत संशयास्पद आढळून आला आहे. या तरुणाचे पाय देखील दोरीने बांधलेल्या स्थितीत दिसून आले आहेत. त्यामुळं ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत पोलिसांनी अधिकचा तपास सुरु केला आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या तरुणाचे पाय देखील दोरीने बांधलेल्या स्थितीत दिसून आल्यानं आत्महत्या की हत्या? असा संशय व्यक्त केला जातो आहे. गणेश बहिरवाळ असं मृत तरुणाचे नाव असून तो पोलीस भरतीची तयारी करत होता.
व्यायामासाठी घराबाहेर पडला असता बीड बायपासवरील छत्रपती संभाजी महाराज चौका नजीक असलेल्या एका शेतात गणेशचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. एका ट्रक चालकाने हा मृतदेह पाहिल्याने टोल फ्री क्रमांकावर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.