येरवडा गणेशनगरमध्ये हत्यारांसह दहशत; ७ आरोपी ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशनगर परिसरात ५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुमारे ११ वाजता हत्यारासह फिरून परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४६/२०२५ असा नोंदवून कलम १८९(२), ३(५) बीएनएस, ४(२५) हत्यार कायदा तसेच ३,७ क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात सहभागी असणाऱ्या पाच विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर करण्यात आले. तर उर्वरित दोन आरोपी
१. शैलेश राजू मोहिते (१९), रा. लक्ष्मीनगर, येरवडा
२. रितेश संतोष खुडे (१९), रा. लक्ष्मीनगर, येरवडा
यांना अटक करून घटनास्थळी नेऊन तपास करण्यात आला. फरार आरोपींचा शोध सुरू असून याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.