मद्यप्राशनाचा अहवाल पॉझिटिव्ह, प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढणार?

Spread the love

मद्यप्राशनाचा अहवाल पॉझिटिव्ह, प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढणार?

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुण्यातील एका रेव्ह पार्टीत धाड टाकत रविवारी पोलिसांनी दोन महिलांसह एकूण ७ जणांना ताब्यात घेतले होते. यामध्ये राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना देखील अटक करण्यात आली. पोलिसांनी अटक केल्यानंतर पार्टीत सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आता या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर आला आहे. ससून रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता‌ सातपैकी दोघांनी मद्यपान केल्याचा प्राथमिक अहवाह पोलिसांनी दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याचे ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. मात्र सात जणांपैकी कोणी अंमली पदार्थांच सेवन केलं होतं का? हे मात्र न्यायवैद्यकिय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेल्या आरोपींच्या नमुण्यांच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. अर्थात खाजगी जागेमध्ये मद्यपान करणे हा गुन्हा ठरत नाही. मात्र त्या पार्टीत अंमली पदार्थ सापडल्याचा दावा पुणे पोलीसांनी केला आहे. त्यामुळे प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढणार की दिलासा मिळणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अंमली पदार्थांच सेवनाच्या अहवालातून नेमकं काय समोर येईल, याबाबत येत्या ४८ तासांत स्पष्ट होईल.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची नावे

प्रांजल मनिष खेवलकर(४१),

निखिल जेठानंद पोपटाणी (३५), समीर फकीर महमंद सय्यद (४१), सचिन सोनाजी भोंबे (४२),श्रीपाद मोहन यादव (२७),ईशा देवज्योत सिंग (२३) आणि प्राची गोपाल शर्मा (२२) अशी आहेत. दरम्यान सातही आरोपींना काल न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी विजयसिंह ठोंबरे यांनी प्रांजल खेवलकरांची बाजू मांडली. प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन केलेलं नाही. मेडीकल रिपोर्ट येतील तेव्हा लक्षात येईल कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन केलंलं नव्हतं. प्रांजल खेवलकर राहत असलेल्या हॉटेलची रेकी करण्यात आली होती. प्रांजल खेवलकरांना अडकवण्यासाठी ट्रॅप रचण्यात आला. हा सगळा प्लांटेड पदार्थ प्रकार असल्याचं प्रांजल खेवलकरांचे वकील ठोंबरे यांनी काल माध्यमांशी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon