अंधेरी पोलिसांची मोठी कामगिरी; वृद्धांची फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार नाशिकमधून गजाआड, ६ गुन्ह्यांचा पर्दाफाश 

Spread the love

अंधेरी पोलिसांची मोठी कामगिरी; वृद्धांची फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार नाशिकमधून गजाआड, ६ गुन्ह्यांचा पर्दाफाश 

मुंबई – वृद्ध नागरिकांना लक्ष्य करून फसवणुकीचा धडाका लावणाऱ्या एका धूर्त गुन्हेगारास अंधेरी पोलिसांनी अत्यंत शिताफीने नाशिकमधील इगतपुरी येथून अटक केली आहे. या सराईत आरोपीवर ४० हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, मुंबईसह आसपासच्या परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तो वॉन्टेड होता. १५ जुलै २०२५ रोजी अंधेरी पूर्व येथील तेली गल्लीत वृद्ध फिर्यादीसोबत ही फसवणूक घडली. आरोपीने गोड बोलून फिर्यादीला गप्पेत गुंतवले आणि २८ ग्रॅम सोन्याची साखळी “फसव्या कारणाने” मागवून तिची फसवणूक केली. यानंतर तो बेमालूमपणे पसार झाला.

पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे व त्यांच्या पथकाने सलग ५ दिवस सीसीटीव्ही फुटेजचा सखोल अभ्यास केला. आरोपी सतत चेहऱ्यावर छत्री धरून फिरत होता आणि मोबाईल फार कमी वापरत असल्याने त्याचा माग काढणे अधिक कठीण झाले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि रेल्वे हालचालींचा मागोवा घेत अखेर इगतपुरी रेल्वे स्थानकात सापळा रचत त्याला अटक केली. अटक आरोपीचं नाव मुनावर उर्फ अन्वर अब्दुल हमीद शेख, वय: ५० वर्षे, राहणार: कुरेशी नगर, कुर्ला पूर्व, मुंबई, पार्श्वभूमी: डिसेंबर २०२४ मध्ये तुरुंगातून सुटल्यावर त्याने पुन्हा फसवणुकीचा धंदा सुरू केला. त्याच्यावर अनेक अटक व अजामीनपात्र वॉरंट प्रलंबित होते. सदर आरोपीकडून

१. अंधेरी पोलीस ठाणे – गु.र.क्र. ५७२/२५,

२. वाकोला पोलीस ठाणे – गु.र.क्र. २८०/२५

३. सायन पोलीस ठाणे – गु.र.क्र. २३७/२५

४. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे – गु.र.क्र. ४३/२५

५. वसई रेल्वे पोलीस ठाणे – गु.र.क्र. १८२/२५

६. दादर रेल्वे पोलीस ठाणे – गु.र.क्र. १७०/२५ आदी गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अपर आयुक्त परमजित सिंह दहिया, उप आयुक्त दत्ता नलावडे, आणि सहाय्यक आयुक्त डॉ. शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, तर कारवाई व.पो.नि. उमेश मचिंदर, पो.नि. विनोद पाटील, पो.उ.नि. किशोर परकाळे, पोलीस हवालदार: पेडणेकर, सूर्यवंशी, शिंदे, लोंढे, म्हात्रे, पाटील, मोरे, तांत्रिक सहाय्यक पो.ह. विशाल पिसाळ यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon