दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार; ती व्यक्ती आमदाराच्या जवळची असल्याची माहिती समोर, पोलिसांकडून तपास सुरूच

Spread the love

दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार; ती व्यक्ती आमदाराच्या जवळची असल्याची माहिती समोर, पोलिसांकडून तपास सुरूच

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – दौंडच्या कलाकेंद्रात मंगळवारी रात्री गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चौफुला इथून पुढे रेणुका कला केंद्रात गाणी वाजवण्यावरून दोन गटात वाद झाला. त्यामध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबार करणारी व्यक्ती ही आमदाराच्या जवळची असल्याने हे प्रकरण झाकले जात असल्याचा आरोप केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील चौफुलाच्या पुढे रेणुका कलाकेंद्र आहे. कलाकेंद्रात मंगळवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली. कलाकेंद्रात दोन गटात वादावादी झाली. लावणी वाजवायची कि डीजेवरची गाणी वाजवायची यावरून वाद झाला होता. त्यावेळी गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. तो व्यक्ती आमदाराच्या जवळचा असल्याचे कळते आहे. पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांनी सीसीटीव्ही तपासणी सुरु असल्याचे सांगितले आहे. तसेच गोळीबार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ती व्यक्ती एका आमदाराच्या जवळची असल्याने हे प्रकरण झाकले जात असल्याचं आरोपही होऊ लागला आहे.

२४ तास उलटूनही पोलिसांना या प्रकरणाची काहीच माहिती मिळाली नाहीये. कला केंद्राच्या मालकांना विचारले असता त्यांनी गोळीबार झाला नसल्याचे सांगितले आहे. आमच्याकडे हा प्रकार हा घडला नाही. पोलिसांनी चौकशी करावी असेही त्या म्हणाल्या आहेत. जर तसं काही आढळल्यास कारवाई करावी असंही रेणुका कलाकेंद्रांचे मालक म्हणाले आहेत. दौंडचा गोळीबाराचा तपास पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. २४ तास होऊनही काहीच समोर न आल्याने हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे दिसून येत आहे. आमदाराच्या जवळच्या व्यक्तीने गोळीबार केल्याचे म्हंटले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon