तृतीयपंथीयांचा वेश घेवून आलेल्या चौघांना मुलं पळविण्याच्या संशयावरून बेदम मारहाण

Spread the love

तृतीयपंथीयांचा वेश घेवून आलेल्या चौघांना मुलं पळविण्याच्या संशयावरून बेदम मारहाण

योगेश पांडे / वार्ताहर 

वसई – शाळकरी मुलांचे अपहरण करण्याचा डाव गावकऱ्यांनी उधळवून लागला आहे. ही घटना वसई पश्चिमेच्या खोचिवडे गावातील कुरणवाडी इथं घडली आहे. गावातल्या मुख्य रस्त्या लगत चालत जात असणाऱ्या लहान शाळकरी मुलांचा अपहरण करण्याचा डाव होता. त्यात तीन मुलींना आणि एका मुलाचे अपहरण करण्याच्या प्रयत्न करण्यात आला, असा आरोप गावकऱ्यांचा आहे. त्यांनी तो डाव हाणून पाडल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. तृतीयपंथीयांचा वेश घेवून काही जण गावात आले होते. त्यांच्या सोबत एक रिक्षा चालक ही होता. गावकऱ्यांनी या चार ही जणांना बेदम मारहाण केली आहे. तृतीयपंथीयांच्या वेशात तीन पुरुष होते. एक त्यांचा रिक्षा चालक अशा चार जणांनी हा डाव रचला होता. शाळेतून मुलं घरी येत होते. त्यावेळी त्यांना चाकूचा धाक दाखवण्यात आला. शिवाय रस्त्यात अडवून पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी मुलांनी आरडाओरडा केला. त्यामुळे गावकरी सावध झाले. त्यांनी त्या मुलांच्या दिशेने धाव घेतली.

हे लोक मुलांचे अपहरण करण्याच्या तयारीत होते असं गावकऱ्यांनी सांगितलं. गावकरी या मुलांच्या दिशेने धावले.तेथे जवळपास उभे असलेल्या गावकऱ्यांनी त्या तृतीय पंथीच्या वेशातील तीन जणांच्या तावडीतून त्या लहान मुलींची सुटका केली. यावेळी संतप्त जमावाने चारही आरोपींना चांगलाच चोप दिला. त्यानंतर वसई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसही त्या ठिकाणी पोहोचले. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहेत. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलं पळवणारी टोळी या भागात सक्रीय तर झाली नाही ना त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon