१ कोटी ६९ लाखांचा ‘एमडी’ ड्रग्ज साठा जप्त; ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Spread the love

१ कोटी ६९ लाखांचा ‘एमडी’ ड्रग्ज साठा जप्त; ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई

ठाणे : अंमली पदार्थविरोधात ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. ठाणे गुन्हे शाखा, घटक-१ यांनी केलेल्या कारवाईत तब्बल १ कोटी ६९ लाख २६ हजार रुपये किमतीचा १ किलो २०९ ग्रॅम ‘एमडी’ अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मुंब्रा बायपास उड्डाणपुलाजवळ करण्यात आली. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा (वय ५५, रा. प्रगती नगर, कुडूस, वाडा, जि. पालघर) हा संशयास्पदपणे मारुती एस×४ (एमएच-४८-अ-३१२६) कारमधून जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.

गुन्हे शाखा, घटक-१ चे अधिकारी व अमलदारांनी तातडीने सापळा रचत सदर कार थांबवली. झडती घेतली असता त्यामध्ये बाजारमूल्य १,६९,२६,०००/- रुपये असलेला १ किलो २०९ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ आढळून आला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १२४४/२०२५ नोंदवण्यात आला असून, एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २२ (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी मोहनलाल जोशी यास अटक करण्यात आली असून, त्याचे साथीदार कोण होते? तसेच सदरचा अंमली पदार्थ नेमका कोठून आणला होता? याचा सखोल तपास सुरू आहे.

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड व त्यांच्या पथकाने केली. पथकात सहा. पोलीस निरीक्षक अमित यादव, पो.उ.नि. प्रकाश शिरसाठ, सहा. पो.उ.नि. दयानंद नाईक, दीपक जाधव, भरत आरवंदेकर, पोहवा नंदकुमार पाटील, धनंजय आहेर, शशिकांत सावंत, महिला पो.नाईक तेजश्री शेळके, पो.शिपाई मयूर लोखंडे व सागर सुरळकर यांचा समावेश होता. या यशस्वी कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रीच्या साखळीत महत्त्वाचा दुवा पकडण्यात पोलिसांना यश मिळाले असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon