खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने महिला आत्महत्येस प्रवृत्त; लिव्ह-इन पार्टनरविरोधात गंभीर गुन्हा

Spread the love

खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने महिला आत्महत्येस प्रवृत्त; लिव्ह-इन पार्टनरविरोधात गंभीर गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई – रबाळे परिसरात राहणाऱ्या ४४ वर्षीय महिलेने खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, आर्थिक फसवणूक आणि मानसिक त्रासामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेच्या लिव्ह-इन पार्टनरविरोधात रबाळे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे, दमदाटी, मारहाण, तसेच खाजगी क्षण व्हायरल करण्याची धमकी यासह अनेक गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोटावळे गावातील पीडित महिला ८ जुलै २०२५ रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर, ११ जुलै रोजी महिलेच्या मुलीने रबाळे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, वसईतील रहिवासी संदीप जाधव (वय ३७) हा पीडितेसोबत नोव्हेंबर २०२१ पासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. या काळात त्याने तिचा विश्वास संपादन करून सुमारे १० लाख रुपये उकळले. पुढे जेव्हा महिला त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करू लागली, तेव्हा आरोपीने तिचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याचबरोबर संदीप जाधवने पीडितेच्या दोन्ही मुलींना देखील अश्लील व धमकीचे फोन आणि मेसेज पाठवले. तसेच, पीडितेला वारंवार मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. या सर्व त्रासामुळेच पीडित महिलेने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप मुलीने केला आहे.

या प्रकरणी रबाळे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत खालील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे:

कलम १०८ – आत्महत्येस प्रवृत्त करणे
कलम ७७ – विनयभंग व कपटाने खाजगी क्षण चित्रीकरण (वॉयरिझम)
कलम ३१६(२) – फसवणूक व विश्वासघात
कलम ७४ – महिलेसोबत अश्लील वर्तन/अवमान
कलम ११५(२) – दुखापत करणे
कलम ३५२ – भांडण व अपमान घडवून आणणे
कलम ३५१(३) – धमकी देणे
सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केलेली नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon