दुबई-भारत ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त, पाहिजे आरोपी मुस्तफा कुब्बावाला अखेर अटकेत; रु. २५६ कोटींचा मेफेड्रॉन जप्त

Spread the love

दुबई-भारत ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त, पाहिजे आरोपी मुस्तफा कुब्बावाला अखेर अटकेत; रु. २५६ कोटींचा मेफेड्रॉन जप्त

मुंबई – घाटकोपर गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-७ ने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीप्रकरणी मोठी कामगिरी केली असून, दुबईतून भारतात मेफेड्रॉनचा पुरवठा करणाऱ्या मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला या प्रमुख तस्करास अखेर अटक करण्यात आली आहे. यापूर्वी त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती आणि युएसए पोलिसांच्या मदतीने त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी, पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून परवीन बानो शेख हिला अटक केली होती. त्यांच्याकडून ६४१ ग्रॅम मेफेड्रॉन, रु.१२.२० लाख रोख व रु १.५ लाख किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले. तिच्या चौकशीतून साजीद शेख उर्फ डॅब्स याचा तपास लागला. मिरा रोड येथून त्याला अटक करण्यात आली. ३ किलो मेफेड्रॉन (रु. ६ कोटी मूल्य), रु. ३.६८ लाख रोख

पुढील तपासातून सांगली जिल्ह्यातील इरळी गावात एका मेफेड्रॉन तयार करणाऱ्या गुप्त कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला. १२२.५ किलो मेफेड्रॉन (₹२४५ कोटी मूल्य), पोलिसांनी आतापर्यंत एकूण रु. २५६ कोटींपेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये मेफेड्रॉन: रु. २५२ कोटी, रोख रक्कम: रु. ३.६२ कोटी यांचा समावेश आहे. ताहेर सलीम डोला, जो या रॅकेटमध्ये अंगडिया म्हणून कार्यरत होता, त्याला १३ जून २०२५ रोजी अटक करण्यात आली.

अखेर, रेड कॉर्नर नोटीसवरून मुख्य सूत्रधार मुस्तफा कुब्बावाला याला दुबईतून अटक करून भारतात आणण्यात आले. ही प्रचंड यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन,वपोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१), विशाल ठाकूर सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व) चंद्रकांत जाधव

या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखा, घाटकोपर कक्ष-७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, पो.नि. अरुण थोरात (खंडणी विरोधी पथक), स.पो.नि. धनाजी साठे, पो. उ.नि. स्वप्निल काळे, महेश शेलार, परबळकर, स.पो. उ.नि. क्र. पवार, पो.ह.क्र. राऊत.

मुंबई पोलिसांच्या तांत्रिक तपास कौशल्य, सखोल माहिती संकलन, आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील एक मोठे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात यश मिळाले आहे. प्रमुख सूत्रधारांच्या अटकेमुळे या टोळीला मोठा धक्का बसला असून, अंमली पदार्थविरोधातील लढ्याला ही कारवाई मोलाची ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon