पालघर जिल्ह्यातील २९ अंमलदारांना मिळाली पदोन्नती
पालघर / नवीन पाटील
राज्य शासनाच्या प्रचलित धोरणानुसार, रिक्त पदांच्या तुलनेत शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार पदोन्नती देण्याचे निर्देश आहेत. या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील पोलीस दलामध्ये पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडण्यात असून एकूण २९ पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे.
या पदोन्नती प्रक्रियेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पदोन्नती समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, पोलीस उप अधीक्षक (गृह) संगीता शिंदे-अल्फोन्सो तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक यांचा समावेश होता.
या समितीमार्फत जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई यांच्या पात्रतेची बारकाईने तपासणी करून, नियमांनुसार त्यांना पदोन्नती देण्यात आली.
बॉक्स कोट…
🔹 १४ सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (API) यांना पोलीस उप निरीक्षक या पदावर पदोन्नती मिळाली.
🔹 ७ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती प्राप्त झाली.
🔹 ८ पोलीस नाईक/पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार पदावर बढती मिळाली.