मुंबई बॉम्बस्फोटतील मुख्य आरोपी साकीब नाचनचा तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत पक्षाघाताने मृत्यू

Spread the love

मुंबई बॉम्बस्फोटतील मुख्य आरोपी साकीब नाचनचा तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत पक्षाघाताने मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर 

दिल्ली – मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी ईसीस दहशतवादी संघटनेचा म्होरक्या साकीब नाचन याचा पक्षाघाताने मृत्यू झाला आहे. नाचनचे वकील समशेर अन्सारी यांनी त्याच्या मृत्यूची माहिती दिली आहे. नाचन हा तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असताना त्याला पक्षाघाताचा झटका आला. त्यानंतर त्याला दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. साकिब नाचन याला १९९० च्या दशकातल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी ‘टाडा’ न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. पाच वर्षे तुरुंगात राहिल्यावर नाचणची सुटका झाली. पुन्हा २००२ आणि २००३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी साकिबला अटक झाली. त्यावेळी तो ठाणे कारागृहात होता. नाचण याची वर्तणूक चांगली असल्यानं त्याची पाच महिने १३ दिवस आधीच सुटका केली होती. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाण्यातील पडघा येथे दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणाच्या संदर्भात छापे टाकले होते. यावेळी नाचन याला अटक करण्यात आली होती.

साकिब नाचनवर दहशतवादी संघटना आयएसएसआय आणि सिमी शी संबंध असल्याचा आरोप आहे. साकिब नाचन यांना २००२ आणि २००३ मध्ये मुंबईतील घाटकोपर, विले पार्ले आणि मुलुंड रेल्वे स्थानकांवरील बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी म्हणून दोषी ठरविण्यात आले होते. याप्रकरणी त्याला पोटा अंतर्गत १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. २०१७ मध्ये त्याची शिक्षा पूर्ण झाल्यावर त्याची सुटका झाली होती.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआईए) साकिब नाचन याला २०२३ मध्ये पुन्हा अटक केली. त्यांच्यासह १५ जणांना आयएसएसआय मॉड्यूल प्रकरणात अटक करण्यात आली, ज्यात त्याचा मुलगा शमील नाचन आणि भाऊ आकिब नाचन यांचाही समावेश आहे. महाराष्ट्र एटीएस आणि पोलिसांनी साकिब नाचन याच्या बोरीवली-पडघा येथील घरी छापेमारी केली. सुमारे ३०० पोलिसांनी २० ठिकाणांवर छापे मारले होते. त्याच्यावर देशभरातील तरुणांना पडघा गावात आणून दहशतवादी प्रशिक्षण देण्याची योजना आखल्याचा आरोप होता. साकिब नाचनने ठाण्यातील पडघा गावाला ‘अल-शाम’ म्हणजेच इस्लामिक शरिया कायद्याने स्वतंत्र क्षेत्र घोषित केल्याचा देखील आरोप होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon