धक्कादायक! बीडच्या क्लासमध्ये १७ वर्षांच्या मुलीचं दोन नराधम शिक्षकांकडून लैंगिक शोषण
शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारी घटना
पोलीस महानगर नेटवर्क
बीड – खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये ‘नीट’ ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून बीड शहरात हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात. या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या मुलीची छेड काढून क्लासेसच्या केबिनमध्ये लैंगिक छळ केला जात होता. घडलेला प्रकार मुलीने आपल्या मैत्रिणीला सांगितला. मात्र, शिक्षकांकडून होणारा त्रास असाह्य झाल्याने मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून दोन्ही शिक्षक अद्याप फरार आहे.
पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संत भगवान बाबा उच्च माध्यमिक महाविद्यालय खरवंडी कासार येथे ११ वीचे ऍडमिशन घेतले असून एप्रील २०२४ मध्ये उमा किरण कोचिंग क्लासेस येथे नीटचे क्लासेस लावले होते. सकाळी ०९.०० ते १२.०० पर्यंत उज्वल अभ्यासिका येथे अभ्यासीका लावली होती व तेथे मी नेहमी अभ्यास करण्याकरीता जात असायचे. जुलै २०२४ पासून प्रशांत खाटोकर सर १२.०० वा.ती अभ्यासीकेमधुन बाहेर येण्याच्या वेळेला माझ्या अभ्यासीकेच्या खाली येवून थांबायचे व मला म्हणायचे तू माझ्यासोबत चल गाडीवर बस, तेव्हा मी त्याला नाही म्हणायचे. क्लासेसची वेळ दुपारी २ ते दुपारी ६ पर्यंत असायचा. मी तेथे क्लास रेग्युलर करत होते. प्रशांत खाटोकर सर जे फिजिक्स शिकवतात ते मला क्लास संपल्यानतर तेथील केबिनमध्ये एकटीला बोलवून ते माझी कीस घ्यायचे, माझ्या छातीला व गुप्त अंगाला बॅड टच करायचे. अंगावरील कपडे काढायला लावून माझे ते फोटो काढायचे. कधी कधी ते क्लास संपल्यानंतर क्लासरुम मध्ये कोणी नसताना तिथे सुध्दा ते मला किस करायचे व छातीला व इतर अंगाला बॅड टच करायचे. ते असे माझ्यासोबत वारंवार करत असायचे. मला धमकी द्यायचे की, तू जर घरी कोणाला सांगितले तर मी तुला मारुन टाकेन, अशी धमकी प्रशांत खाटोकर यांनी आपल्याला दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मुलीने दुसऱ्या सरांची मदत मागितली, त्यांनीही फायदा उचलला
मला प्रशांत खाटोकर सर यांचा बॅड टच आवडत नसायचा म्हणून विजय पवार सर यांना सांगीतले तेव्हा ते मला म्हणाले की, त्यांना आम्हीच ठेवले, मुलींना त्रास देण्यासाठी. असे म्हणून ते पण माझ्यासोबत वाईट वागायला लागले व ते मला केबिनमध्ये कोणी नसताना किस करायचे माझ्या छातीला व गुप्त अंगाला बॅड टच करायचे. ते मला सर्व मुले दुसऱ्या क्लासला गेले की, बाजूला बोलवायचे व एकटीला थांबून ठेवायचे. तेव्हा सर्व क्लासमधील मुले माझ्याकडे वाईट नजरेने बघायची. ते मला आवडत नसायचे. मी ही झालेली घटना मझी मैत्रीण आर्या पिंगळे हिला सांगितरी तेव्हा ती मला म्हणाली की, ते आपले सर आहेत आपण त्यांचा रिस्पेक्ट करायचा. त्यामुळे मला या गोष्टीचा त्रास होऊ लागल्यामुळे हा झालेला प्रकार मी माझ्या आई- वडीलांना सांगितला आणि त्यानंतर आई-वडील मला तक्रार द्यायला पोलीस ठाण्यात घेऊन आले, असे या मुलीच्या तक्रारीत म्हटले आहे.