पालघर रेल्वे स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटल्याने स्फोट, रेल्वेसेवा विस्कळीत
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – पालघर रेल्वे स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटल्याने स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. पालघर वांद्र एक्सप्रेस ट्रेनवर ही वायर कोसळली त्यामुळे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पालघरमध्ये झालेल्या या घटनेमुळे अप आणि डाउन मार्गावरील सेवा प्रभावित झाली आहे. या घटनेबाबत ट्रेनमधील एका प्रवासी महिलेने सांगितले की, ‘रेल्वे कमी वेगाने धावत होता. अचानक मला काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी खाली उतरुन पाहिले तर ट्रेनच्या खाली उतरले होते आणि व्हिडिओ बनवत होते.’
पुढे बोलताना या महिलेने म्हटले की, वायर तुटलेल्या ठिकाणी ठिणग्या उडत होत्या, त्यामुळे लोक घाबरलेले होते. रेल्वे प्रशासन प्रवाशांना आतमध्ये बसण्याची विनंती करत होते, मात्र लोक खाली उतरलेले होते. दुसऱ्या एका महिलेने सांगितले की, प्रवास असुरक्षित वाटत आहे. घराच्या बाहेर पडावं की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. आम्ही पावसात उभे राहिलो आहोत, आम्हाला ट्रेनमध्ये जाण्याची भीती वाटत आहे. तसेच अनेक प्रवाशांनी स्फोटानंतर गाडीतून खाली उडी मारल्याचीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पश्चिम रेलवेच्या पालघर रेलवे स्थानकवर ओवर हेड वायर तुटल्याने अप आणि डाऊन दोन्ही दिशेने जाणारी सर्व लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. पालघरच्या दिशेने जाणाऱ्या दोन लोकल आणि एक लांब पल्याची ट्रेन विरार स्थानकात थांबली आहे. कामावरून घरी जाण्याच्या वेळेस ही घटना घडल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. बांद्रा येथून निघालेली बांद्रा अजमेर एक्सप्रेस पालघर येथे थांबली होती आणि पालघर रेल्वे येथून जात असताना प्लॅटफॉर्म नंबर तीन वरून एक नंबर वर क्रॉसिंग करत असताना अचानक ट्रेनवर ओहर हेड वायर पडली आणि मोठा स्फोट झाल्याने प्रवासी यांची तारांबळ उडाली, ह्या दरम्यान एका महिला प्रवाशाने आपल्या जीव वाचवण्यासाठी चालत्या ट्रेनवरून उडी मारली, सुदैवाने कुठली ही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.