पोलीस उपायुक्त परिमंडळ ३, कल्याण यांच्या पुढाकाराने ‘जागतिक योग दिन’ उत्साहात साजरा होणार
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – पोलीस उपायुक्त, परिमंडळ ३ कल्याण आणि रोटरी क्लब ऑफ कल्याण सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २१ जून २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता, वरटॅक्स बिल्डिंग, स्टील पार्किंग, रिलायन्स स्टोअर जवळ, वायले नगर, कल्याण पश्चिम येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात पोलीस विभागातील अधिकारी, अंमलदार तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग असणार आहे. यासोबतच मेडिकल असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघ, रोटरी क्लब, तहसीलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, आणि कल्याणमधील प्रमुख महाविद्यालये जसे की बिर्ला कॉलेज, मुथा कॉलेज, अग्रवाल कॉलेज, मातोश्री हरिया कॉलेज यांचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
विविध सामाजिक संस्था आणि योग ग्रुप चे सदस्यही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता रोटरी क्लब ऑफ कल्याण सिटी यांनी विशेष सहकार्य केले आहे. सामूहिक आरोग्यवृद्धीसाठी आणि योगप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशाने घेण्यात येणाऱ्या या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.