पुण्यातील जेजुरीजवळ स्विफ्ट कारचा भीषण अपघात, ७ जण जागीच ठार, ५ जण गंभीर जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पीकअप टेम्पोच्या भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्दैवी अपघातात एका महिलेसह ७ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जेजुरी मोरगाव रस्त्यावरील एका कंपनी समोर रात्री सव्वा ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं आहे. दरम्यान, अपघात एवढा भीषण होता की ७ जण ठार झाले असून ५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिळालेली माहितीनुसार , पुण्याहून मोरगावकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार एम एच ४२ ए एक्स १०६० जेजुरीकडून मोरगावकडे जात असताना श्रीराम ढाब्यासमोर पिकअप टेम्पोला ( एम एच १२ एक्स एम ३६९४ ) मधील साहित्य खाली करीत असताना जोरदार धडक दिली. येथील रस्त्यावरील एका कंपनी समोरील हॉटेल श्रीराममध्ये पीकअप टेम्पोमधील साहित्य उतरविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पीकअप टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात स्विफ्ट कारमधील पाच जण तर पिकअपमध्ये असलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यावरुन, अपघाताची दाहकता लक्षात येईल.
सोमनाथ रामचंद्र बायसे (२१), रामू संजीवन यादव, अजयकुमार चव्हाण, अजित अशोक जाधव,किरण भारत राऊत,अश्विनी संतोष येसार आणि अक्षय शंकर राऊट अशी अपघातील मृतांची नावे आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून मृतांचे पार्थिक शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.