ठाण्यातील कळवा नाका परिसरातील एका कामगार महिलेची हत्या
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाण्यातील कळवा नाका या परिसरातून एका नाका कामगार महिलेची हत्या करण्यात आली आहे.या महिलेला सकाळच्या सुमारास कामासाठी नेले होते. दुपारी ती महिला मृत अवस्थेत इमारतीमध्ये आढळून आली. शांती सुरेश चव्हाण असे या महिलेचे नाव असून कळवा पूर्व सम्राट अशोक नगर येथे ही महिला वास्तव्यात होती. मृतावस्थेत असताना या महिलेच्या गळ्यात गुंडाळलेली ओढणी आणि महिलेच्या मानेवर तसेच पोटावरदेखील धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे दिसून आले.
या हत्येने नाका कामगार महिलामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित महिलेल्या न्याय मिळावा या करिता नाका कामगार महिलांनी कळवा येथील छत्रपति शिवाजी महाराज रुग्णालयाबाहेर गर्दी केली.