पंचवटीतील घरफोडीचा गुन्हा उघड; गुन्हेशाखा युनिट दोनच्या पथकाची यशस्वी कारवाई

Spread the love

पंचवटीतील घरफोडीचा गुन्हा उघड; गुन्हेशाखा युनिट दोनच्या पथकाची यशस्वी कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क 

नाशिक – पंचवटी परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल २ लाख ५० हजार रुपयांची स्कोडा कार तसेच लॅपटॉप आणि घड्याळ हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक मनोहर शिंदे आणि पोलिस शिपाई महेश खांडबहाले यांना क्रांतीनगर, मखमलाबाद रोड परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी करून काही जण कारने विल्होळीमार्गे पाथर्डी गावाच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पाथर्डी शिवारातील कचरा डेपो परिसरात सापळा रचला.

या सापळ्यातून सागर दत्तात्रय गरड (वय ३३), महेश सदाशिव मालखेडे (वय २१) आणि एक विधिसंघर्षित बालक यांना अटक करण्यात आली. चौकशीत क्रांतीनगर, मखमलाबाद येथील घरफोडी त्यांनी केल्याची कबुली दिली. आरोपींपैकी एका व्यक्तीविरोधात निफाड, ओझर आणि सायखेडा पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या यशस्वी कारवाईमुळे स्थानिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon