नाशिकमध्ये घरफोडी करणाऱ्या चोराला ठोकल्या बेड्या; ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – सिडको अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत डॉ. हेडगेवारनगर येथील एका घरात घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने लुटून पोबारा करणाऱ्या संशयिताला गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने सापळा रचून बेड्या ठोकल्या. स्वप्नील संजय पवार (१९, रा. पाटीलनगर, सिडको) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. घराच्या पाठीमागील बाजूचा दरवाजा उघडा राहिल्याचे बघून पहाटेच्या सुमारास पवार याने घरात प्रवेश करून कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला होता. गुन्हे शाखा युनिट २ ने सापळा रचून संशयितास अटक केली असून, त्याच्याकडून ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.