राज्य उत्पादन शुल्क, भिवंडी विभागाची बनावट विदेशी मद्यावर कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी – डॉ.राजेश देशमुख आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, तसेच प्रसाद सुर्वे, संचालक (अंमलबजावणी व दक्षता), राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि प्रदीप पवार, विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे यांच्या आदेशान्वये व प्रविण तांबे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. एस. खंडेराय व त्यांच्या पथकाने एक महत्त्वाची कारवाई केली.
दिनांक ०४/०६/२०२५ रोजी भिवंडी तालुक्यातील सोनाळे-भादवड रोड, भादवड येथे अवैधरीत्या भेसळयुक्त बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार निरीक्षक खंडेराय यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक संजय बोधे, संजय वाकचौरे, सहाय्यक दु.नि. अर्जुन कापडे व कर्मचारी नारायण जानकर, गणेश पाटील, सचिन पवार, निलेश तायडे तसेच श्रीमती स्वरुपा भोसले यांच्या पथकाने तत्काळ त्या ठिकाणी दबा धरून कारवाई केली.
सदर ठिकाणी एमएच ०४-एमएल-३७३२ या क्रमांकाची सुझुकी अवेनीस दुचाकी वाहन थांबवून पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये एकूण ८ बॉक्स भेसळयुक्त बनावट विदेशी मद्य आढळून आली. वाहनासह एकूण रु. १,०६,४६८/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास निरीक्षक एस. एस. खंडेराय, राज्य उत्पादन शुल्क, भिवंडी विभाग, ठाणे हे करत आहेत.