कोल्हापूरमध्ये लिव्ह इन रिलेशिनशिप राहणाऱ्या प्रियकराने, परंतु लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीचा केला खून

Spread the love

कोल्हापूरमध्ये लिव्ह इन रिलेशिनशिप राहणाऱ्या प्रियकराने, परंतु लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीचा केला खून

पोलीस महानगर नेटवर्क 

कोल्हापूर – कोल्हापूर येथील करवीर तालुक्यातील सरनोबतवाडीतील अमृतनगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इनमध्ये राहणारी २३ वर्षीय समीक्षा ऊर्फ सानिका भरत नरसिंगे हिने लग्नास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने तिचा चाकूने भोसकून खून केला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अमृतनगर परिसरात भाड्याने राहत असणाऱ्या घरात घडली. हल्लेखोर सतीश मारुती यादव हा पसार झाला असून, त्याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान हल्ले खोराच्या शोधासाठी तीन पथके पोलिसांनी रवाना केली आहेत. सानिका यापूर्वी २०१९ मध्ये लक्षतीर्थ वसाहतीतील एका तरुणाशी विवाहबद्ध झाली होती. मात्र, सहा महिन्यांतच मतभेदांमुळे दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. याच काळात सानिकाने तिची मैत्रीण आयुष्यासोबत इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू केला. यातूनच तिची सतीशशी ओळख झाली. तिघेही गेल्या चार महिन्यांपासून सरनोबत वाडीत एका फ्लॅटमध्ये राहत होते. सतीश सानिकावर लग्नासाठी दबाव टाकत होता, परंतु तिला लग्न करायचे नव्हते, ज्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. लग्नाचा हंगाम संपल्याने फ्लॅटचे भाडे परवडत नसल्याने त्यांनी फ्लॅट सोडण्याचा निर्णय घेतला.

चार दिवसांपूर्वी फ्लॅट सोडल्यानंतरही त्यांचे साहित्य तिथेच होते. घरमालकाच्या सांगण्यावरून सानिका आणि आयुष्या साहित्य घेण्यासाठी दुपारी दोन वाजता फ्लॅटवर गेल्या. त्याचवेळी सतीशही तिथे पोहोचला. सानिकासोबतच्या वादानंतर त्याने तिच्या छातीत चाकू खुपसला आणि फ्लॅटला बाहेरून कडी लावून पळून गेला. आयुष्याने सानिकाचा ओरडण्याचा आवाज ऐकला, पण ती मदत करू शकली नाही. तिने सानिकाच्या मित्राला फोन करून माहिती दिली. मित्राने फ्लॅट उघडून सानिकाला रुग्णालयात नेले, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon