ट्रॉम्बे पोलिसांकडून परराज्यातील मुख्य गांजा पुरवठाधारक आरोपीसह एकूण दोन आरोपींना अटक

Spread the love

ट्रॉम्बे पोलिसांकडून परराज्यातील मुख्य गांजा पुरवठाधारक आरोपीसह एकूण दोन आरोपींना अटक

२२ किलो गांजा हस्तगत

रवि निषाद/मुंबई

मुंबई – ट्रांबे पोलिसांकडून परराज्यातील मुख्य गांजा पूरवाठाधारक आरोपी सह एकूण दोन आरोपीला अटक करुन २२ किलो गांजा हस्तगत करण्यात आले आहे.ज्याची कीमत अंदाजे कि.रु. ४,४३,०००/- रुपये सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॉम्बे पोलीस ठाणे, मुंबई यानी २२ किलो गांजा सह दोन आरोपीना अटक केली आहे. सदर आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हे क्रमांक १०३/२०२५, (२६९/२०२५) कलम ८ (क),२०(बी)(ii)(सी),२९ गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत पोलिसांनी कारवाई केली. सदर कारवाई एस्सेल स्टुडिओ च्या बाजूला, इलेक्ट्रिक पोल क्रमांक ७५ जवळ, ट्रॉम्बे बस टर्मिनल, जुनी जेटी रोड, ट्रॉम्बे, मुंबई यातील आरोपी इसम यांनी ४,४३,०००/-किमतीचा एकूण २२ किलो २३० ग्रॅम वजनाचा “गांजा “हा अमली पदार्थ विक्री व वाहतूक करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बेकायदेशीर रित्या बाळगला म्हणून सदर आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी दिनेश शिवाजी घाडगे वय ४६ वर्ष व्यवसाय रिक्षाचालक रा.ठी.भूमी अपार्टमेंट,तिसरा मजला,रूम नंबर ३०२, टीएमटी डेपो मागे लोकमान्य नगर, वागळे इस्टेट, ठाणे आणि उत्तम रब्बी साहू वय २९ वर्ष रा.ठी. गाव रेगुनापुरा तालुका गोजाम राज्य ओरिसा असे सांगण्यात येत आहे.सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉ.महेश पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०६ श्री नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, ट्रॉम्बे विभाग, श्री.राजेश बाबशेट्टी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ट्रॉम्बे पोलीस ठाणे,श्री राजेश शिंदे, पोलीस निरीक्षक विजय गरुड यांच्या मार्गदर्शना खाली ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक श्री शरद नानकार व दहशतवादी विरोधी पथकाने केली आहे. नवनाथ ढम्हणवले मार्गदर्शना खाली स.पो.नि. सुशील लोंढे,पो.उप. नि.शरद नाणेकर, पो.उप.नि.मनोज ठाकूर,रमेश धुमाळ, पो.हवालदार आव्हाड, पो.हवा.आखाडे पो. हवा.लेंभे, देशमुख, माळी, वाळके आणि बाविस्कर च्या टीमनवी केली आहे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिंदे यानी या मधे प्रमुख मार्गदर्शन केली असून उपायुक्त नवनाथ ढवळे यानी समाधान कारक कारवाईची प्रशंसा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon