वेस्टर्न रेल्वेमार्गावर झाड तारांवर कोसळून चर्चगेट- मरिनलाईन्स स्थानकांदरम्यान शॉर्टसर्किटमुळे स्फोट

Spread the love

वेस्टर्न रेल्वेमार्गावर झाड तारांवर कोसळून चर्चगेट- मरिनलाईन्स स्थानकांदरम्यान शॉर्टसर्किटमुळे स्फोट

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – सोमवार सकाळपासून मुंबईत तुफान पाऊस सुरु झाल्यामुळे अनेक भागात पाणी साचलं. त्यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळला. अशातच मुंबई पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि मरिन लाईन लोकल स्थानकाच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे मोठे स्फोट झाल्याची घटना घडली. विद्युत वाहिनीवर झाड आल्यानं त्याला देखील आग लागली. मुंबईत सोमवारी सकाळी ९ ते १० दरम्यान ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. मुंबई महापालिकेच्या काही ऑटोमॅटिक वेदर स्टेशनवर एका तासात ८० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली,तर दक्षिण मुंबईतील एका स्टेशनवर १०४ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, आयएमडीनं सकाळी ९ ते १०दरम्यान झालेला पाऊस हा ढगफुटी नसल्याचं सांगितलं. आयएमडीकडून दक्षिण मुंबईतील त्या एका तासातील पाऊस हा अतिमुसळधार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon