बीडच्या वंजारवाडी गावात श्रमदानात सहभागी न झालेल्या कुटुंबाला सरपंचाकडून मारहाण, दोन महिला जखमी

बीडच्या वंजारवाडी गावात श्रमदानात सहभागी न झालेल्या कुटुंबाला सरपंचाकडून मारहाण, दोन महिला जखमी

योगेश पांडे / वार्ताहर 

बीड – गावातील श्रमदानात सहभाग का घेतला नाही, असा जाब विचारत एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बीड तालुक्यातील वंजारवाडी गावात समोर आलीय. याप्रकरणी मारहाण झालेल्या कुटुंबाकडून देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड तालुक्यातील वंजारवाडी गाव आदर्श म्हणून ओळखले जाते. याच गावात श्रमदारातून झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमात विठ्ठल तांदळे यांचे कुटुंब सहभागी झाले नाही. दरम्यान याचाच राग मनात सरपंच वैजनाथ तांदळे याच्यासह इतर सहा जणांनी या कुटुंबातील तिघांना बेदम मारहाण केली. सध्या तांदळे कुटुंबावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून मारहाणीत दोन महिलांचा समावेश आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon