विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या प्राध्यापकाला बेड्या; ऑनलाइन सेक्स रॅकेटचाही पर्दाफाश, मुंबईतील कॉलेजमधील घटना

Spread the love

विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या प्राध्यापकाला बेड्या; ऑनलाइन सेक्स रॅकेटचाही पर्दाफाश, मुंबईतील कॉलेजमधील घटना

मुंबई – महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी एका १७ वर्षीय विद्यार्थिनीची छेड काढल्याची एक संतापजनक घटना उजेडात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी प्राचार्यांवर गुन्हा दाखल करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी मुंबईच्या नागपाडा परिसरात आपल्या कुटुंबासह राहते. ती बोरिवलीच्या एका महाविद्यालयात शिक्षण घेते. तिथे आरोपी प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे. यासंबंधीच्या तक्रारीनुसार, आरोपी प्रिन्सिपल गत अनेक महिन्यांपासून विद्यार्थिनीशी लगट करण्याच्या प्रयत्नांत होता. तिच्याशी चुकीचा व्यवहार करून वारंवर तिची छेड काढत होता. आरोपीने कथितपणे विद्यार्थिनीशी शारिरीक संबंध प्रस्थापित करण्याचाही प्रयत्न केला. या प्रकाराला कंटाळून विद्यार्थिनीने मुंबईच्या एएचबी पोलिसांशी संपर्क साधून त्यांना या घटनाक्रमाची माहिती दिली. त्यानतंर पोलिसांनी प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेत तत्काळ गुन्हा दाखल करून ३७ वर्षीय आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी सध्या पोलिस कोठडीत असल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीशी वारंवार संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तिची छेड काढली. अवैध संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. सुरुवातीला तरुणी लोकलाजेखातर शांत राहिली. तिने ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. पण मानसिक व शारिरीक छळ सहन करण्याच्या मर्यादेपलिकडे गेल्यानंतर तिने अखेरीस एमएचबी पोलिसांकडे धाव घेतली. एमएचबी ठाणे पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, आरोपीवर बीएनएस कलम ७४, ७५ व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणी अद्याप आपली बाजू स्पष्ट केली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon