खळबळजनक ! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन रांगेत चोरी करणाऱ्या दोघींना अटक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – देवाच्या दारी भक्तिभावाने येणाऱ्या भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दोघींना विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केलं आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातील दर्शन रांगेत महिला भाविकांकडील दागिने चोरणाऱ्या माधुरी संतोष डुकरे-घाडगे (वय ३०), काव्या तनवीर जाधव (वय २१, दोघी रा. यवत रेल्वे फाटकाजवळ, यवत, ता. दौंड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला इंदापूर तालुक्तातील विठ्ठलवाडीतील रहिवासी आहेत. रविवारी (४ एप्रिल) दुपारी तीनच्या सुमारास त्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्या लहान मुलीला घेऊन दर्शन रांगेत थांबल्या होत्या. त्या वेळी आरोपी माधुरी आणि काव्या हिने तक्रारदार महिलेच्या मुलीच्या गळ्यातील ४० हजारांचे सोनसाखळी चोरुन नेली. महिलेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिने आरडाओरडा केला. दर्शनरांगेतील भाविकांनी माधुरी आणि काव्या यांना पकडले. पकडून सुरक्षारकांच्या ताब्यात दिले. पोलीस कर्मचारी काटे तपास करत आहेत.