३० पेक्षा जास्त गुन्हे नोंद असणाऱ्या सराईत आरोपीस अटक

Spread the love

३० पेक्षा जास्त गुन्हे नोंद असणाऱ्या सराईत आरोपीस अटक

रवि निषाद/मुंबई

मुंबई – मानखुर्द पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. अटक आरोपीचं नाव साकिर अब्दुल रहीम शेख (३३) आहे. ज्याच्यावर ३० पेक्षा अधिक गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे.

परिमंडळ – ६ चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सांगितले की, मानखुर्द पोलिसांनी २१ एप्रिल रोजी जावेद महबूब शेख (२८) याची रिक्शा चोरी झाली होती.त्याच्या तक्रारीवरून पोलिसानी गुन्हा रजि. क्र. २२६/२०२५ कलम ३०३(२) भा.न्या. स.अंतर्गत नोंद करण्यात आला. दत्त मंदिराजवळील कचराकुंडी जवळ महात्मा फुले नगर मानखुर्द मुंबई या ठिकाणी घडलेल्या या घटनेचा तपास करत पोलिसांनी साकीर अब्दुल रहीम शेख (३३), साईदीबार जवळ इंदिरानगर झोपडपट्टी लल्लुभाई कंपाऊंड मानखुर्द मुंबई याला पोलिसांनी अटक केली. यातील अटक आरोपीवर मालमत्ते संदर्भात ३० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत असे सांगण्यात येत आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या ताब्यातील एम.एच.०३ डी.सी २४४२ ही ऑटो रिक्षा घटनास्थळी पार्क केली होती. कोणीतरी अज्ञात इसमाने लबाडीच्या इराद्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय रिक्षा चोरी केली. फिर्यादी हे स्वतः मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरिता आले असता त्यांचा सविस्तर जबाब नोंद करून गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी भेट देऊन घटना स्थळा वरील खाजगी व शासकीय सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने व गुप्त बातमीदाराकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने यातील पाहिजे आरोपी अज्ञात इसम हा लल्लूभाई कंपाउंड मानखुर्द येथील सिमेंट मैदाना जवळ येणार असल्याचे समजताच तेथे गुन्हे प्रकटीकरण पथकाने योग्य तो सापळा लावून यातील पाहिजे आरोपीस ताब्यात घेतले. सदर इसमास पोलीस ठाण्यात आणून सदर गुन्ह्यातील चोरी झालेल्या ऑटो रिक्षा बाबत कसून तपास केला असता त्याने सदरची रिक्षा चोरी केल्याचे कबूल केले. तसेच यातील अटक आरोपीने सांगितल्याप्रमाणे ३० पेक्षा अधिक गुन्हे केले असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या तपास कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मधु घोरपडे

यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. गणेश वाघ, पो.ह.भाट, पाटील,भोर, घोरपडे,

सणस,नोळे यांची होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon