डोंबिवलीमधून गणेश बाळु अहिरे उर्फ गटल्याला एमपीडीए कायद्यांतर्गत जेरबंद, डोंबिवली पोलीसांची कारवाई

Spread the love

डोंबिवलीमधून गणेश बाळु अहिरे उर्फ गटल्याला एमपीडीए कायद्यांतर्गत जेरबंद, डोंबिवली पोलीसांची कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली – येथील शेलारनाका परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश बाळु अहिरे उर्फ गटल्या याच्यावर डोंबिवली पोलीस स्टेशनला शिवीगाळी, दमदाटी करुन मारहाण करणे, घातक शस्त्र वापरुन दंगा करणे, घातक शस्त्र जवळ बाळगणे व जीवे ठार मारण्याची धमकी देणे असे गुन्हे दाखल आहेत. तसेच सदर गुन्हेगार याच्या गुन्हेगारीस आळा बसण्याकरीता सीआरपीसी १०७ व ११० प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती, त्या प्रतिबंधक कारवाईस तो दाद देत नसल्याने, गुन्हेगारी कृत्य चालुच ठेवल्याने त्याच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी त्यास १८ महीने कालावधी करीता दिनांक २१/०१/२०२४ रोजी तडीपार करण्यात आले होते.

तरीसुद्धा सदर गुन्हेगार हा तडीपार आदेशाचे उल्लंघन करून, पुन्हा त्यास प्रतिबंध केलेल्या परिसरात येवुन गुन्हे करू लागल्याने, तसेच डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीतील लोकांमध्ये दहशत निर्माण करून त्याची या परिसरात दहशत निर्माण झाल्यामुळे या परिसरातील सर्वसामान्य नागरीकांचे जीवन जगणे धोक्यात येत असल्याने, सार्वजनिक शांततेस बाधक ठरत असल्याने सदर गुन्हेगार गणेश बाळु अहिरे उर्फ गटल्या यावर एमपीडीए कायद्यांतर्गत १ वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द करण्यासाठी डोंबिवली पोलीस स्टेशन तर्फे पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता, त्यावरून श्री आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी १ वर्षासाठी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द करण्याचे दि. १६/०४/२०२५ रोजी आदेश काढल्याने गुन्हेगार गणेश बाळु अहिरे उर्फ गटल्या यास ताब्यात घेवुन त्यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे १ वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आलेले आहे. तसेच डोंबिवली पोलीस स्टेशन तर्फे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर गेल्या वर्षभरात ४ मोक्का, २ एमपीडीए व ११ आरोपींवर तडीपार कारवाई करण्यात आली असुन त्यात १३ आरोपी कारागृहात आहेत. तसेच डोंबिवली पोलीस ठाणे अंतर्गत आजपर्यंत एकुण १० मोक्का ची कारवाई करून २४ आरोपी कारागृहात आहेत. तसेच एमपीडीए कायद्यांतर्गत २ आरोपी स्थानबध्द करण्यात आलेले आहे.

सदर आरोपी गणेश उर्फ गटल्या यांच्यावर विविध स्वरूपाचे ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपण राहत असलेल्या परिसरात गुन्हेगारी वृत्तीचे इसम जर त्रास देत असतील, तर डोंबिवली पोलीस ठाणे येथे समक्ष येऊन आम्हाला माहीती द्यावी असे आवाहन डोंबिवली पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon