दिवसा घरफोडी करणारा आरोपी अटकेत, अर्धा डझन गुन्हे उघडकीस

Spread the love

दिवसा घरफोडी करणारा आरोपी अटकेत, अर्धा डझन गुन्हे उघडकीस

२८ तोळे सोने आणि २ किलो चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत

रवि निषाद / मुंबई

मुंबई – मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका घरफोडीच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव राजेश अरविंद राजभर (३२) असे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसापूर्वी मुलुंड पोलिसांच्या हद्दीत एक घरफोडीची घटना घडली होती. पोलिसांचा तपास केल्यावर पोलिसांनी आरोपी राजेश अरविंद राजभार यांना ठाणे येथील कळवा भागातून अटक केली. जेव्हा त्या आरोपीकडे पोलिसांनी विचारपूस सुरुवात केली तेव्हा त्याने इतर ५ चोरीच्या घटना घडवून आणल्याची कबूली दिली. त्यानुसार पोलिसांनी एकूण १५ लाख ६५ हजार मालामत्ता त्याच्याकडून जप्त केली आणि त्यापूर्वीही त्याच्यावर अर्धा डझनाहून अधिक गुन्हे असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ.महेश पाटील आणि परिमंडल ७ चे पोलिस उपायुक्त विजयकुमार सागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय जोशी यांनी उत्तम कौतुकास्पद काम केले आहे. श्री विजयकुमार सागर यांच्या देखरेखीखाली मुलुंड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन खडगे, डिटेक्शन अधिकारी गणेश कट्टा, रमेश ढेबे, बस्तिराम बोडके आणि सचिन बॅन्सोड यांनी कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon