नाशिक जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा पुन्हा एकदा चव्हाट्यावर, अपघात विभागातच २ गटात तुफान हाणामारी
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये पुन्हा हाणामारीची घटना घडली आहे. अपघात विभागातच दोन गट आमने-सामने आल्यानं तुफान हाणामारी झाली आहे. उपचारासाठी आलेल्या जखमी आणि नातेवाईकांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळाली आहे. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात दोन हा वाद झाल्याची माहिती आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकचे जिल्हा रुग्णालय विविध घटनेने चर्चेत आहे. नाशिकचे जिल्हा रुग्णालय शुक्रवारी पुन्हा एकदा हाणामारीच्या घटनेने चर्चेत आले आहे. दोन गटांच्या वादानंतर जखमींवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.