आरसीएफ पोलिसांची यशस्वी कारवाई; देशी बनावटीची २ अग्निशस्त्रं व ८ जिवंत काडतुसे जप्त
मुंबई – येथील चेंबूर परिसरात शस्त्र विक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती सपोनि खंदारे यांना मिळाल्यानंतर, त्यांनी दहशतवादविरोधी पथकाचे पोउनि गणेश कर्चे व त्यांच्या पथकासह जिजामाता जंक्शन, माहुल रोड, चेंबूर येथे सापळा रचला. दिनांक ०३ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९:३५ वाजता, अंगत सिंह श्रीराम गोपाल जाधव (वय २९, रा. रूटोली, ता. शिरसा, जि. इटावा, उत्तरप्रदेश) या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे २ देशी बनावटीची पिस्तुले आणि ८ जिवंत काडतुसे सापडली.
याप्रकरणी त्याच्याविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१)(अ), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोउनि गणेश कर्वे करत आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ६) नवनाथ ढवळे आणि सहायक पोलीस आयुक्त (ट्रॉम्बे विभाग) राजेश बाबशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईचं नेतृत्व आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार गाठे यांनी केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सपोनि मैत्रानंद खंदारे, पोशि केदार, राउत, माळवे, सानप तसेच दहशतवाद विरोधी पथकाचे पोउनि गणेश कर्चे, सफी वाणी, पोह खैरे आणि येळे यांनी मिळून ही यशस्वी कारवाई केली. या ठोस आणि संघटित प्रयत्नामुळे अवैध शस्त्रविक्रीस आळा घालण्यास मोठं यश मिळालं आहे.