दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल होणार?
दिशा सालियनच्या वडिलांकडून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत सामूहिक बलात्कार, हत्या आणि अत्यंत गंभीर आरोप
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – दिशा सालियन मृत्यू प्रकरणात ५ वर्षानंतर मोठी अपडेट समोर आली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी केली आहे. पूर्ण तपास सीबीआयकडं सोपवण्याची मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी केली आहे. दिशा सालियनचा खून झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. दिवगंत अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्युच्या काही दिवसांपूर्वी त्याची माजी मॅनेजर दिशा सालियनने देखील आत्महत्या केली होती. तिच्या निधनानंतर कलाविश्वात मोठी खळबळ माजली होती. दिशाच्या आईवडिलांनीच ती आत्महत्या करण्याची शक्यता नसल्याचं म्हटलंय. ती थोडी अडचणीत असली तरी एवढी डिप्रेस का होती, हे माहित नसल्याचं दिशाची आई वासंती सालियन यांनी म्हटलं होते. २०२१ मध्ये दिशाचा मृत्यू झाला.
आता जवळपास ५ वर्षानंतर दिशाच्या मृत्यूची स्वतंत्र, निष्पक्ष, पारदर्शक चौकशीची मागणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे केली आहे. आदित्य ठाकरे, दिनो मोरियाचे कॉल रेकॉर्ड तपासा एकता कपूर, सचिन वाझेचे कॉल रेकॉर्ड तपासा अशी मागणी त्यांनी केली आहे. आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, सूरज पांचोली, एकता कपूर, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती, इम्तियाज खत्री, शोविक चक्रवर्ती, आदित्यचे सुरक्षा रक्षक हिमांशू शिक्रे या सर्वांचे ३ ते २० ऑगस्ट २०२० चे कॉल रेकॉर्ड चेक करा टॉवर लोकेशनही तपासून घ्यावे मागाणी देखील सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे केली आहे. सतीश सालियन यांनी याचिकेत किशोरी पेडणेकरांवरही गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकरांनी सालियन कुटुंबावर दबाव टाकला. नितेश राणे, नारायण राणेंवर खोट्या आरोपांसाठी दबाव टाकला. किशोरी पेडणेकरांनी साक्षीदारांना जबाब न नोंदवण्यासाठी धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
खटला महाराष्ट्राबाहेर चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. दिशा सालियनच्या पोस्ट मॉर्टेमचा व्हिडिओ कोर्टाला सादर करावेत दिशाच्या इमारतीचं ३ ते १० जूनचं सीसीटीव्ही फुटेज कोर्टाला द्यावं. सतीश सालियन यांची मुलाखत घेण्यापासून मीडियाला रोखावं. आतापर्यंत झालेली चौकशी बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी तपास करण्याऐवजी प्रकरण दाबले.हा तपास म्हणजे काही शक्तिशाली लोकांना वाचवण्यासाठीचं नाटक होतं. ख-या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी खोट्या कहाण्या रचल्या गेल्या. मुंबई पोलिसांनी दिशाच्या आत्महत्येचा खोटा नरेटिव्ह सेट केला. जे पुरावे समोर आले त्यानुसार अमानुष सामूहिक बलात्कार, खून झाला. अमानुष सामूहिक बलात्कारानंतर हत्या करुन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी केली आहे.